अविनाश चव्हाण खूनप्रकरणातील पाचही जणांना कोठडी

हरी तुगावकर
बुधवार, 27 जून 2018

लातूर : येथील स्टेप बाय स्टेप क्लासेस संचालक अविनाश चव्हाण यांचा गोळी झाडून खून केल्या प्रकरणात अटकेत असलेल्या पाचही जणांना बुधवारी (ता. २७) येथील न्यायालयासमोर उभे करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना (ता. ३) जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

येथील स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांचा सोमवारी मध्यरात्री येथे गोळी झाडून खून करण्यात आला होता.या प्रकरणात चव्हाण यांचा एकेकाळचा भागीदार प्रा. चंदनुकमार शर्मा हा मास्टर माईंड निघाला होता. त्याच्यासह पोलिसांनी करण गहिरवार, महेंद्रकुमार बोगाडे,शरद घुमे, अक्षय शेंडगे यांना अटक केली होती. या सर्वांना बुधवारी न्यायालयासमोर उभे करण्यात आले आहे. या आरोपींकडून आणखी तपास करायचा असल्याने त्यांनाकोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांच्या वतीने वकिलांनी केली. ती मान्य करीतन्यायालयाने या पाचही आरोपींना (ता. ३) जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी दिली.
 
Web Title: Avinash Chavan murder case five people in custody