जागतिक मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी अविनाश राचमाले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

लातूर ः जागतिक मराठी अकादमी व मुंबईतील श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळातर्फे "शोध मराठी मनाचा-2017' हे चौदावे जागतिक मराठी संमेलन येत्या सात व आठ जानेवारीला मुंबईत दादर येथील शिवाजी मंदिरात होणार आहे.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती, मूळचे येथील रहिवासी अविनाश राचमाले यांची निवड झाली आहे. जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होईल. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर व जयंत सावरकर यांना "जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

"शोध मराठी मनाचा' हे संमेलन चित्रपट, रंगभूमी, कला, साहित्य, क्रीडा, ज्ञान, माहिती आणि मनोरंजनावर आधारित असून संमेलनात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इस्त्राईल, कतार, ब्रिटन आदी देशांतून मान्यवर सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल.

रामदास फुटाणे अकादमीचे अध्यक्ष आहेत. जागतिक मराठी अकादमीने 2004 पासून "शोध मराठी मनाचा' हे आगळेवेगळे संमेलन भरविण्यास सुरवात केली.

Web Title: avinash rachmale to preside over literary meet