coronavirus : धर्मगुरू, मौलवी म्हणाले, हम साथ है! 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बीड - कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून सर्वच जण खबरदारी घेऊ लागले असून, आता धार्मिक नेत्यांनीही कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळा व काळजी घेऊन हा आजार टाळावा असे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे. धार्मिक स्थळांमध्येही दर्शनासाठी गर्दी होते. यावरही तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. यासाठी सोमवारी (ता. 16) धर्मगुरू, मंदिरांचे विश्वस्त, मौलवींसोबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची बैठक झाली.

कोरोनाला हरविण्यासाठी या आपत्तीमध्ये धर्मभाव विसरून एकत्र येण्याचे आवाहन करताना- ‘कोरोना के साथ इस संघर्ष में हमे आजही ये तय करना है। इसमे देरी से कितनोंकी जान जा सकती है। इस नेक कामे कोई धर्म, जात नहीं सिर्फ इन्सानियत ही एक है।’ असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. त्याला धर्मगुरू, मंदिरांचे विश्वस्त, मौलवींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लढाई में मुकम्मल तौर पे हम आपके साथ रहेंगे, ये संसर्गजन्य साथ कितनों की जान का मसला है! हम लोगों को इस बारेमे वाकीफ करायेंगे, जिंदगी खतरे मे है, उस खतरे को दूर करना है,’ अशी भावना त्यांनी बोलून दाखविली. 

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत
दरम्यान, मज्जिद मंदिर आदी धार्मिक ठिकाणांवर एकावेळी पाच ते दहा व्यक्तींपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. नमाज अथवा प्रार्थना मंदिर व मस्जिदमध्ये न जाता घरीच पूर्ण करावे मंदिर, मस्जिदमध्ये एकावेळी पाच ते दहा व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींनी गर्दी करू नये, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. 

निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख, जमियत-उलमा, मौलाना इकराम, मुफ्ती अशफाक, सलीम जहांगीर, ॲड. शेख शफिक, अॅड. ख्वाजा, मुफ्ती आरीफ आदींची उपस्थिती होती. वैद्यनाथ मंदिरात 31 मार्चपर्यंत दर्शनासाठी न येण्याचे भाविकांना आवाहन केले जाईल, मंदिरामध्ये फक्त नियमित पूजा व आरती सुरू राहील, असे राजेश देशमुख यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com