Ayodhya Verdict : पोलिस अधीक्षकांचे हिंदू-मुस्लीम बांधवांसोबत चहापान!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

निकालानंतर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बशिरगंज, बालेपीर, मोमीनपुरा याठिकाणी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला.

बीड : बाबरी मशीद पतनानंतर उसळलेल्या दंगलीचे तीव्र पडसाद उमटल्याचा इतिहास असलेल्या बीड जिल्ह्यात अयोध्या निकालाचे शांततेत स्वागत झाले. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी निकालानंतर संवेदनशील भागांची पाहणी करून विविध समाज घटकांशी संवाद साधत सार्वजनिक ठिकाणी चहापानही केले.

- Ayodhya Verdict : कार सेवा म्हणजे काय? कोठून आला शब्द?

1992 साली बाबरी मशीद पतनानंतर उसळलेल्या दंगलींचे पडसाद बीड जिल्ह्यातही उमटले होते. बीडसह परळी, माजलगाव आणि केज या शहरांत अशांतता पसरून एका पोलिस कर्मचाऱ्यालाही हौतात्म पत्करावे लागल्याचा इतिहास आहे. अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर पोलिस दल आणि जिल्हा प्रशासनाने सर्व उपाय योजना केल्या होत्या. तसेच दोन्ही समाजबांधवांच्या शांतता समितीच्या बैठका घेऊन शांततेचे आवाहन केले होते.

- ढगांच्या अडथळ्यानंतर 'अंबाबाई किरणोत्सव' दुसऱ्या दिवशी यशस्वी; फोटो पाहिलेत का?

खबरदारीचा उपाय म्हणून सामाजिक अशांतता पसरविणाऱ्या साधारण दीडशे लोकांवर कारवाया केल्या होत्या. या सर्व बाबींचा सकारात्मक परिणाम अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर जिल्ह्यात दिसला. निकालानंतर सायंकाळपर्यंत जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. समाजमाध्यमांतूनही कुठेही सामाजिक अशांतता पसरेल, अशी पोस्ट फिरली नाही. सर्वच समाजघटकांनी या निकालाचे स्वागत केले.

- Ayodhya Verdict : अयोध्या निकालामुळे पाकिस्तानच्या पोटात दुखतंय!

दरम्यान, निकालानंतर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बशिरगंज, बालेपीर, मोमीनपुरा याठिकाणी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अधिक्षकांनी जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालचा आदर करत, शांतता कायम ठेवल्याबद्दल नागरिकांसोबत चहापानही केले. दरम्यान, निकालानंतर असलेल्या शांततेबद्दल त्यांनी पोलिस दलासह समाबांधवांचेही कौतुक केले.

Image may contain: 3 people, people smiling, people standing and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayodhya Verdict after the supreme court result the Beed police Superintendent met with Hindu and Muslim