सव्वा कोटींचा बाबा जर्दा जप्त 

प्रल्हाद कांबळे 
सोमवार, 24 डिसेंबर 2018

नांदेड : जिल्ह्यातील मरखेल ते तुंबरपल्ली रस्त्यावर मरखेल पोलिस शनिवारी (ता. 22) रात्री गस्त घालत होते. यावेळी त्यांनी एक संशयतीरित्या जाणारा आयचर कंटेनर थांबविला. यात विनापरवानगी, बेकायदेशीररित्या कंटेनरसह बाबा 120 सुगंधीत जर्दा एक कोटी 20 लाख 44 हजार 541 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. 

मरखेल पोलिस ठाण्याची हद्द ही तेलंगना व कर्नाटका सिमेला लागून आहे. या भागातून अवैध वाहतुकीमार्फत गुटखा, सिंदी, दारु, गौन खनीज आदी विनापरवाना राज्यात बंदी असलेले अन्नपदार्थ आणण्यात येतात. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक संजय जाधव व अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी देगलूर उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी मरखेल ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड यांना आदेश दिल्यानंतर त्यांनी आपले सहकारी फौजदार दिनेश येवले, चिठ्ठलवाड आणि भुले यांना सोबत घेऊन शनिवारी रात्री आपल्या हद्दीत गस्त घातली यावेळी कंटेनर (युपी 14 एफटी-7198) मधून बाबा 120 सुंगधीत जर्दा मिळून आला. चालक महेश विशकर्मा रोनग्राम, जिल्हा भेट (मध्यप्रदेश) याला अटक केली. अन्न व औषध प्रशासनाच्या वरील रक्कमेचा माल ताब्यात दिला. या कारवाईमुळे अवैध गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: baba jarda of rupees 1.25 lakhs are seized