बाबाजानी दुर्राणी उमेदवारी अर्ज भरणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

परभणी : आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे बुधवारी (ता.4) दुपारी एक वाजता नागपूर येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

आगामी विधान परिषद निवडणुक या महिण्यात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे मंगळवारी (ता.4) दुपारी एक वाजता त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नागपूर विधान भवनातील निवडणुक निर्णय अधिकारी विलास आठवले यांच्याकडे हा अर्ज सादर केला जाईल. 

दुर्राणी यांच्या अर्जावर सुचक म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर आमदारांच्या सुचक म्हणून स्वाक्षऱ्या आहेत. अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सुनिल तटकरे या मोठ्या नेते मंडळीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील विधानसभा व विधान परिषदेचे सर्व आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
 
Web Title: Babajani Durrani will fill the application for candidature