चांगल्या उमेदवारांना पाठिंबा देणार, वेळप्रसंगी उमेदवारही उभे करणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

औरंगाबाद, नगर, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यांतील 35 विधानसभा मतदारसंघांत जय बाबाजी भक्तपरिवार निर्णायक भूमिका बजावणार असून, यात एकतर उमेदवारांना पाठिंबा देणार किंवा प्रसंगी निवडणूक रिंगणात उमेदवार उतरविणार असल्याचे परिवाराचे संत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रतोद रामानंद महाराज यांनी रविवारी (ता.29) सांगितले.

खुलताबाद (जि.औरंगाबाद) ः औरंगाबाद, नगर, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यांतील 35 विधानसभा मतदारसंघांत जय बाबाजी भक्तपरिवार निर्णायक भूमिका बजावणार असून, यात एकतर उमेदवारांना पाठिंबा देणार किंवा प्रसंगी निवडणूक रिंगणात उमेदवार उतरविणार असल्याचे परिवाराचे संत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रतोद रामानंद महाराज यांनी रविवारी (ता.29) सांगितले.

विधानसभा निवडणुकीबाबत जय बाबाजी भक्तपरिवाराची भूमिका स्पष्ट करण्यासाठी संत जनार्दन स्वामी आश्रमात पत्रकार परिषद घेण्यात आली. जय बाबाजी परिवाराची भूमिका मांडताना रामानंद महाराज म्हणाले, ""राजकारणाच्या शुद्धीकरणाचा वसा परिवाराने घेतला असून, चांगले, स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार विधानसभेत पाठविणे हेच आमचे कर्तव्य आहे. औरंगाबाद, नगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यांतील 35 विधानसभा मतदारसंघांत जय बाबाजी भक्तपरिवार निर्णायक भूमिका बजावणार आहे. चांगल्या उमेदवारास पाठिंबा देण्याबरोबरच प्रसंगी स्वतःचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणार आहे.'' याप्रसंगी प्रचारप्रमुख राजेंद्र पवार, जिल्हा संपर्क सेवक झुंबरशेठ मोडके, सचिव गणेश बोराडे, जिल्हासेवक शेकनाथ होळकर, बाजीराव गांगुर्डे, संजय गायकवाड, जनार्दन रिठे, गणपत म्हस्के आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Babaji Bhakta Pariwar Support Good Candidates