108 अॅम्ब्युलन्समध्येच मातेने दिला कन्येला जन्म

baby
baby

पाथरी : आरोग्य विभागाच्या 108 रुग्ण वाहिकेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिकच गतिमान झाली आहे. तात्काळ सेवा मिळत असल्याने अनेक दुर्घटना टळत आहेत. काल (ता. 3) तालुक्यातील वडी येथील एका गरोदर मातेला 108 अॅम्ब्युलन्समधून वडी - पाथरी येथे घेऊन येत असताना वाटेतच मातेने कन्येला जन्म दिला. विशेष म्हणजे बाळाच्या गळ्याभोवती नाळ असताना देखील डॉक्टर रामप्रसाद दिवटे आणि त्यांच्या टीमने यशस्वी प्रसूती केली.

ग्रामीण रुग्णालय पाथरी विभागाअंतर्गत तालुक्यासाठी 108 च्या 2 अॅम्ब्युलन्स आहेत. ग्रामीण भागात रात्री अपरात्री काही घटना घडल्या नंतर या अॅम्ब्युलन्सचा मोठा लाभ होतोय. गरोदर मातेला वेदना होत असताना प्रसूतीसाठी रुग्णालयापर्यंत पोहचविण्याचे काम फार जिकरीचे असते. 108 अॅम्ब्युलन्समुळे गरोदर मातांच्या प्रसूती सोईच्या आणि सुखकर होऊ लागल्या आहेत.

काल दुपारी 108 ला वडी येथून एक फोन आला गरोदर माता प्रसूतीसाठी तातडीने रुग्णालयात दाखल कारायवायचे आहे. तेव्हा 108 अॅम्ब्युलन्स पाथरीत होती. डॉक्टर रामप्रसाद दिवटे आणि गाडीच्या चालकाने तातडीने गाडी वडी गावात नेऊन माता नंदिनी बाळू शिंदे (वय 28) आणि त्यांच्या नातलग याना गाडीत बसवले. गाडी वडी गावाच्या बाहेर निघून पाथरीकडे येत असताना मातेला वेदना सुरू झाल्या आणि काही अंतर पुढे आल्यानंतर मातेने 3 किलो वजनाच्या कन्येला जन्म दिला. बाळाच्या गळ्याभोवती नाळ असल्याने डॉक्टराणे शर्थीचे प्रयत्न करून येशवी प्रसूती केली बाळ आणि माता दोन्ही सुखरूप आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com