फरशीवर पडून बाळ दगावले

फरशीवर पडून बाळ दगावले

औरंगाबाद - प्रसूतीसाठी घाटीत आणलेली महिला वॉर्डमध्ये नेत असताना बंद लिफ्टसमोर व्हरांड्यातच प्रसूत झाली. मात्र, या घटनेत फरशीवर पडून बाळ (अर्भक) दगावले. ही घटना मध्यरात्री पाऊणच्या सुमारास घडली.

छावणीत राहणाऱ्या व जालना येथे माहेर असलेल्या महिलेला सोमवारी (ता. २१) रात्री प्रसूतीकळा सुरू झाल्या. तिला नातेवाइकांनी घाटीत आणले होते. वाहनातून उतरून लिफ्टकडे चालत जाणारी ही महिला लिफ्टच्या दारातच अचानक प्रसूत झाली. 

यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांदेखत क्षणार्धात घडलेल्या या घटनेत बाळ फरशीवर पडून दगावले. केके ग्रुपचे स्वयंसेवक आणि नातेवाइकांनी बाळ-बाळंतिणीला सावरून अपघात विभागात दाखल केले. बाळंतीण महिलेवर घाटीत उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लिफ्ट बंद का?
लिफ्टपर्यंत पोचण्यापूर्वीच महिलेची प्रसूती झाली, हे खरे असले तरी ही लिफ्ट अनेक दिवसांपासून दुरुस्तीअभावी बंदच होती. ही लिफ्ट सुरू करावी, यासाठी ‘सकाळ’ने पाठपुरावा केला होता. मात्र, तरीही सुरू करण्यात न आलेल्या या लिफ्टच्या दारात एका नवजात चिमुकल्याचा मृत्यू झाला. अपघात विभागाच्या दारात स्ट्रेचर असावे, रुग्णांची ने-आण करण्यासाठी लिफ्ट सज्ज असाव्यात, इतकी काळजीही का घेतली जात नाही, असा संतप्त सवाल रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com