पुढील आठवड्यात शिवसेनेत प्रवेश - बदामराव पंडित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

गेवराई - विधानसभा निवडणुकीत झालेली दगाबाजी जिव्हारी लागली. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मी पुन्हा दुसऱ्याच दिवशी जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी कामाला लागलो. मी कायम जनतेच्या सेवेत आहे. येत्या 17 किंवा 18 जानेवारीला मुंबईत मातोश्रीवर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहे, असे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी जाहीर केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बदामराव पंडित यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा मतदारसंघात चर्चिली जात होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी बदामराव पंडित मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. पंडित म्हणाले की, कार्यकर्ते आणि जनतेच्या आग्रहाखातरच शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेवराई येथे मेळाव्यात प्रवेश करण्याची विनंती केली होती. मात्र आचारसंहितेमुळे अडचण येत असल्याने मुंबईत मातोश्री या निवासस्थानी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहे.

Web Title: badamrao pandit entry in shivsena