माजी मंत्री बदामराव पंडित शिवसेनेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

गेवराई - माजी मंत्री बदामराव पंडित यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करीत मंगळवारी (ता.१७) मुंबईत ‘मातोश्री’वर समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या वेळी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांना शिवबंधन बांधले. 

गेवराई - माजी मंत्री बदामराव पंडित यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करीत मंगळवारी (ता.१७) मुंबईत ‘मातोश्री’वर समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या वेळी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांना शिवबंधन बांधले. 

गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी मंत्री बदामराव पंडित यांचा मोठा मताधिक्‍यांनी पराभव झाला होता. हा पराभव पक्षातील लोकांनीच धोका दिल्याने तो चांगलाच जिव्हारी लागल्याचे त्यांनी बोलून दाखविले होते. तसेच तेव्हापासून त्यांनी पक्षाविरोधात बंड पुकारून तालुक्‍यातील सेवा सोसायटी निवडणुका, तसेच नगरपालिका निवडणूक मित्रमंडळाच्या माध्यमातून लढविली होती. राष्ट्रवादीला सोडून कोणत्याही पक्षात चला असा सूर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांतून निघू लागला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बदामराव पंडित यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाची चर्चा मतदारसंघात, तसेच जिल्ह्यात चर्चिली जात होती. तसेच मागील आठवड्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बदामराव पंडित यांनी जाहीर केले होते.

माजी मंत्री बदामराव पंडित यांच्यासह गेवराई तालक्‍यातून दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा सोमवारी रात्री मुंबईला गेला होता. मंगळवारी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख अनिल जगताप, शिवसेनेचे गेवराई तालुकाप्रमुख अजय दाभाडे, सुदर्शन धांडे, राजेंद्र बेदरे,  युद्धाजित पंडित, रोहित पंडित,  अभयसिंह पंडित,  बप्पासाहेब तळेकर, कादर पटेल, पंढरीनाथ लगड, सदाशिव आहेर, युवराज डोंगरे, महादेव औटे, सुभाष नागरे, आप्पासाहेब औटी, ॲड. इंदानी, कालिदास नवल, शेख एजाज, सुभाष घाडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेचा मेळावा घेणार 
जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे मातोश्रीवर समर्थकांसोबत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या निवडणुकीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तालुक्‍यात शिवसेनेचा मेळावा घेणार आहे. तसेच पक्षाची ताकद वाढवून सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊनच पक्षाचे इमाने इतबारे काम करणार असल्याचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी बोलताना सांगितले.

Web Title: badamrao pandit entry in shivsena