Vidhan Sabha 2019 : युतीच्या घोषणेआधीच शिवसेना नेत्याची बंडखोरी; अपक्ष लढण्याची तयारी

वैजिनाथ जाधव
रविवार, 29 सप्टेंबर 2019

शिवसेनेचे बदामराव पंडित म्हणाले ‘आपनेको अपक्ष लढने का है’

गेवराई (जि. बीड) : आपने को तिकीट नही मिला, आपनेको अपक्ष लढने का है, सबको बोलो’ अशी शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांची ऑडीओ क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. त्यामुळे या क्लिपचीच जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. 

Image may contain: 1 person, glasses

माजी मंत्री बदामराव पंडित यांनी तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशावेळी ‘युतीची चर्चा ही गेवराईच्या जागेपासून होईल, आणि ही जागा भेटली तरच युती होईल’ असा शब्द त्यावेळी त्यांना शिवसेनेचे प्रवेश करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या नेत्याने दिला होता. तसे, त्याकाळी त्यांच्या पक्षप्रवेशापूर्वी जिल्ह्यातील शिवसेनेत माजी मंत्री असे बिरुद लावलेला आणि ग्राऊंड पातळीवर कार्यकर्त्यांची फळी असलेला नेता नव्हता.

युतीच्या घोषणेआधीच शिवसेनेने वाटले एबी फॉर्म

दरम्यान, युतीत बीडची जागा शिवसेनेकडे तर गेवराईची भाजपकडे आहे. येथून लक्ष्मण पवार भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गेवराई मतदार संघात शिवसेनेने चांगले यश मिळविले. जिल्हा परिषदेतील चारही सदस्य फक्त त्यांचेच समर्थक आहेत. तर, गेवराई पंचायत समितीवरही शिवसेनेला सत्ता मिळाली. जिल्हा परिषदेत त्यांच्यामुळेच शिवसेनेला सत्तेचा वाटा मिळाला. त्यावेळी लक्ष्मण पवार व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील दुरावा आणि मुंडे व बदामराव पंडित यांच्यातील राजकीय जवळीक यामुळे बदामराव पंडित यांना उमेदवारी भेटेल असे मानले जाई. परंतु, नंतर पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले आणि राजकीय परिस्थिती बदलली.

राजापूर काँग्रेसकडेच तर, राष्ट्रवादीकडे...

शिवसेनेत जयदत्त क्षीरसागर यांचा प्रवेश झाला आणि त्यामुळे युतीतील एकमेव बीडची पूर्वीपासूनची जागाच शिवसेनेला राहील असेच चित्र आहे. तर, पंकजा मुंडे व लक्ष्मण पवार यांच्यातील दुरावाही संपून खुद्द मुख्यंमत्री फडणवीस व पंकजा मुंडे यांनी बदामराव पंडित यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे युतीची चर्चा होत असली तरी बदामराव पंडित यांना शिवसेनेची उमेदवारी अवघड दिसत आहे. त्यातच रविवारी त्यांच्या आवाजातील ‘आपण को तिकीट नही मिला, आपन को अपक्ष लढने का है, सबको बोलो’ अशी त्यांच्या आवाजातील ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यांची तयारी आणि कार्यकर्त्यांचे जाळे पाहता ते अशी भूमिका घेतीलच असेही पुर्वीपासून वाटतच आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: badamrao pandit will contest independent in vidhan sabha election 2019