दुचाकीला लावलेली साडेसात लाखाची बॅग लंपास 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नांदेड : दुचाकीला लावलेली साडेसात रक्कम असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचालकाची नजर चुकवून लंपास केली. ही घटना देगलूर शहरातील भवानी चौकात बुधवारी (ता. एक) सकाळी घडली. या घटनेमुळे देगलूर शहरात एकच खळबळ उडाली. 

देगलूर शहरातील व्यापारी मोहम्मद उस्मान हाजी हे आपल्या दुचाकीच्या हॅन्डलला साडेसात लाख रुपये असलेली एक बॅग लावून रस्त्याच्या कडेला मोबाईलवर बोलत थांबले होते. त्यांची नजर चुकवून अज्ञात चोरट्याने ती बॅग लंपास केली. गाडीला बॅग दिसली नसल्याने व्यापारी हाजी यांना एकच धक्का बसला. त्यांनी आरडा ओरडा केला मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. त्यांनी थेट देगलूर पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार आपल्या तक्रारीत नमुद केला. त्यांच्या तक्रारीवरून देगलूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. गीते हे करीत आहेत. या घटनेमुळे देगलुर शहरातील व्यापारी भयभीत झाले आहेत. 

Web Title: bag stolen of rupees 7.5 lakhs