उस्मानाबादमध्ये बकरी ईद उत्साहात साजरा

सयाजी शेळके
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

उस्मानाबाद : बकरी ईदनिमित्त शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणच्या ईदगाह मैदानावर बुधवारी (ता. 22) मुस्लिम समाजातील नागरिकांनी विशेष नमाज अदा केली. 

उस्मानाबाद : बकरी ईदनिमित्त शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणच्या ईदगाह मैदानावर बुधवारी (ता. 22) मुस्लिम समाजातील नागरिकांनी विशेष नमाज अदा केली. 

उस्मानाबाद येथे इदगाह मैदानावर मुस्लिम समाजातील नागरिकांनी सकाळी साडेआठच्या सुमारास सामुदायिक नमाज अदा केली. उमरगा, गुंजोटी, परंडा येथेही सामुदायिक नमाज अदा करण्यात आली. केरळ राज्यात पुरामुळे विस्थापित झालेल्या देशबांधवांसाठी प्रार्थना करण्यात आली. नमाजनंतर विश्वशांती, बंधुभाव, सर्व क्षेत्रात देशाची प्रगतीसाठी दुवा करण्यात आली. इदगाह मैदानावर नमाझ पठणानंतर मौलानांनी संदेश दिले. उस्मानाबाद शहरात सकाळी आठपासूनच इदगाहकडे जाणाऱ्या मार्गावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम समाजातील नागरिकांची लगबग सुरू झाली होती. सामुदायिक नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम समाजातील नागरिकांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: bakri eid celebrated in usmanabad