esakal | झाडे वाचविण्यासाठी ठाकरे विरुद्ध मुंडे
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb_20_26_20Munde.jpg

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच मुंबईतील आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देत भाजपला डिवचले. "आरे'मधील झाडाचे एकही पान यापुढे तुटणार नाही, आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्याची घोषणाही ठाकरे यांनी केले. त्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी ट्‌विट करून औरंगाबादेत बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शेकडो झाडे तोडली जात आहेत. ठाकरे सरकार ढोंगी असल्याची टीका केली होती.

झाडे वाचविण्यासाठी ठाकरे विरुद्ध मुंडे

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांचा विषय राज्यभर गाजत आहे. त्यामुळे शिवसेनेने बॅकफूटवर येत एकही झाड न तोडता बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी 110 झाडे तोडावी लागणार असल्याचे समोर आले. त्यामुळे झाडे वाचविण्यासाठी जो न्याय शिवसेनाप्रमुखांना तोच न्याय गोपीनाथरावांसाठी लावला जाईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी (ता. 16) सांगितले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक सिडको भागातील प्रियदर्शिनी उद्यानात उभारले जाणार आहे. त्यासाठी 65 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शासनाकडून यातील पाच कोटी रुपायंचा निधी शासानाने दिला आहे; मात्र स्मारकासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांवरून स्मारक वादात सापडले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच मुंबईतील आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देत भाजपला डिवचले. "आरे'मधील झाडाचे एकही पान यापुढे तुटणार नाही, आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्याची घोषणाही ठाकरे यांनी केले. त्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी ट्‌विट करून औरंगाबादेत बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शेकडो झाडे तोडली जात आहेत.

हेही वाचलेच पाहिजे - ९५ वर्षांचा ‘तरुण’ देतोय व्यायामाचे धडे !

ठाकरे सरकार ढोंगी असल्याची टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेने एकही झाड न तोडता बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दुधडेअरीच्या जागेत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या उभारल्या जाणाऱ्या स्मारकासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांचा विषय समोर आला. गोपीनाथराव मुंडे स्मारकात 110 झाडे बाधित होत आहेत. ती तोडण्यासाठी सिडको प्रशासनाने महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे परवानगी मागितली आहे. यासंदर्भात महापौर श्री. घोडेले यांच्याकडे विचारणा केली असता बाळासाहेबांच्या स्मारकासाठी तो न्याय तोच न्याय गोपीनाथरावांच्या स्मारकासाठी महापालिकेची असेल असे स्पष्ट केले. 

क्‍लिक करा : माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र 
 
सिडको उभारणार स्मारक 
तीन वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय तत्कालीन भाजप सरकारने घेतला. स्मारकाचा आराखडा निश्‍चित करण्यासाठी तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. हे स्मारक उभारण्याचे काम शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) यांच्याकडे देण्यात आले. त्यानुसार सिडकोने कार्यवाही करत मुंडे स्मारकाचा आराखडा निश्‍चित केला. 110 झाडे बाधित होत असल्याने ते तोडण्याच्या परवानगीसाठी मागील महिन्यातच सिडकोने महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे पत्र पाठविले आहे. ही फाइल आयुक्तांच्या टेबलावर पडून आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वृक्ष संवर्धनासाठीच आरे प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. तसेच औरंगाबादेतही बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारताना एकही झाड तोडू नका, अशी सूचना केली आहे. त्यानुसार ठाकरे स्मारकासाठी एकही झाड तोडले जाणार नाही. हीच भूमिका लोकनेते गोपीनाथ मुंडे स्मारकासाठी राहील. 
नंदकुमार घोडेले, महापौर.