5 तुकड्यांसाठी बाळासाहेबांची शिवसेना लाचार- मुंडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

मंत्रिपदाच्या 5 तुकड्यांसाठी बाळासाहेबांची शिवसेना लाचार झाली आहे. मंत्र्यांचे राजीनामे देण्याचं खोटं आश्वासन दिल्याने उद्धव ठाकरेंचं नाव गिनीज बुकात नोंदवलं जाणार आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. आज (ता.23) जालन्यातील घनसावंगीत राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन सभेत ते बोलत होते.

जालना- मंत्रिपदाच्या 5 तुकड्यांसाठी बाळासाहेबांची शिवसेना लाचार झाली आहे. मंत्र्यांचे राजीनामे देण्याचं खोटं आश्वासन दिल्याने उद्धव ठाकरेंचं नाव गिनीज बुकात नोंदवलं जाणार आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. आज (ता.23) जालन्यातील घनसावंगीत राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन सभेत ते बोलत होते.
 

मुंडे म्हणाले, 2014 च्या निवडणुकीत मोदी सरकारने प्रत्येक नागरिकांच्या खात्यावर 15 लाख जमा करण्याचं आश्वासन दिलं. मात्र हे पैसे खात्यावर जमा होईल असा मोदी भक्तांना विश्वास आहे, त्यामुळे मोदी सरकारकडून पैसे आपल्या खात्यावर जमा होईपर्यंत भक्तांकडून 5 ते 6 लाख उसने घ्या आणि सरकारकडून पैसे आल्यानंतर त्यांचे पैसे परत करा असा सल्लादेखिल मुंडेंनी दिला. 
 

यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही पंतप्रधानांसह भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं. दुष्काळात छावण्याची मागणी होत असताना सरकार गायीला वाचवून बाईला नाचवण्याचं काम करत असल्याचा टोला भुजबळ यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत रेल्वे स्टेशनवर चहा विकल्याचं सांगतात. मात्र, ज्या रेल्वेस्टेशनवर त्यांनी चहा विकला ते रेल्वेस्टेशनच अस्तित्वात नसल्याचीही टीका त्यांनी केली.

Web Title: balasaheb Thackerays Shivsena is Helpless dhananjay munde Criticise On Uddhav Thackeray and Shivsena