मुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश  बालयोगी काशीगिरी महाराज यांचे निधन

सचिन चौबे 
गुरुवार, 17 मे 2018

मुर्डेश्वर (औरंगाबाद) : मुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश बालयोगी काशीगिरी महाराज यांचे आज (गुरूवार) रोजी निधन झाले

रात्री त्यांना ह्रदयविकाराचा त्रास झाला होता. सकाळी बेशुद्ध अवस्थेत त्यांना सिल्लोड येथे सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्यांच्यावर शुक्रवार (ता.18) सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. महाराजांचा लाखोंच्या संख्येने भक्तपरिवार असून त्यांनी मुर्डेश्वर संस्थानची वेगळी ओळख निर्माण केली होती. राजकीय क्षेत्रामध्ये सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी नेहमीच मुर्डेश्वर येथील मंदिरात हजेरी लावत होते. बाबाजी तालुक्‍यात 'बालयोगी' नावाने ओळखले जात होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुर्डेश्वर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

Web Title: balayogi kashirigiri maharaj, father of murdeshwar institute, passed away