शिक्षणासाठी पुढाकार घेत गावकऱ्यांनी बनविला बांबूचा पूल (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

- विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार
- बनविला बांबूचा पूल
- निमचौकी येथील शिक्षक, ग्रामस्थांनी घेतला पुढाकार

मुंबई : ग्रामीण भागात आजही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, गावकऱ्यांना बाहेर जाण्यासाठी रस्ता नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याचा प्रवास जीवघेणा असतो. या जीवघेण्या प्रवासातून मार्ग काढत औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेणीच्या डोंगररांगातील एका गावातील गावकऱ्यांनी पूल तयार केला आहे. 

पावसाळा सुरू झाला की गावाचा संपर्कच तुटयचा. अशा परिस्थितीत विद्यार्थी शाळेमध्ये जातील तरी कसे? कारण पाऊस पडला की ओढे नाल्यातून डोंगरावरून पाणी मोठ्या प्रमाणात खाली यायचं. त्यामुळे गावातील मुलांची शाळा बंद व्हायची, अनेकदा सरकारी दरबारी विनंत्या करूनही रस्ता होत नसल्यानं गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन पूल तयार केला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या नीम चौकी या छोट्याशा गावातील ही घटना आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या कमी होत असलेल्या पटसंख्येमुळे ग्रामस्थांच्या मदतीने शिक्षकांनी निमचौकी येथील नदीवर बांबूचा पूल बनविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bamboo bridge built by the villagers for the education of the students