तुरीबरोबर हरभरा खरेदी बंद

उमेश वाघमारे
बुधवार, 16 मे 2018

जालना : नाफेडने वतीने मंगळवारी (ता.15) सायंकाळपासून तूर खरेदी बंद केली आहे. मात्र खरेदी केलेल्या धान्याचा  साठ्यासाठी जागा नसल्याने बुधवारी (ता.16) हरभरा खरेदीचा काटा ही बंद होता.

जालना : नाफेडने वतीने मंगळवारी (ता.15) सायंकाळपासून तूर खरेदी बंद केली आहे. मात्र खरेदी केलेल्या धान्याचा  साठ्यासाठी जागा नसल्याने बुधवारी (ता.16) हरभरा खरेदीचा काटा ही बंद होता.

गतवर्षी खरेदी केलेल्या तुरीचा साठा वखार महामंडळाच्या गोदामामध्ये पडून आहे. त्यामुळे नव्याने खरेदी केलेला हरभरा ठेवणार कुठे असा प्रश्‍न नाफेड पुढे येऊन ठेपला आहे. त्यात मंगळवारी (ता.15) सायंकाळपासून  तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय नाफेडने घेतला आहे. मात्र नाफेडकडून हरभरा खरेदी सुरू आहे. परंतु वखार महामंडळाचे गोदाम फुल झाल्याने खरेदी केलेला हरभरा ठेवण्यास गोदामामध्ये जागा नसल्याने व बारदाना न पुरवल्याने बुधवारी (ता.16) हरभरा खरेदी बंद होती.

जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून बारदाना पुरविण्यात आला नाही. तसेच वखार महामंडळाचे गोदाम फूल झाल्याने बुधवारी (ता.16) हरभरा खरेदी बंद ठेवावी लागली.
-अंकुश परकाळ, व्यवस्थापक, खरेदी केंद्र, जालना (जडाई माता प्रोड्युसर कंपनी)

Web Title: ban on gram with pulse

टॅग्स