नोटाबंदीमुळे "हवाला'दिल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - काळ्या पैशांवर आळा घालण्यासाठी केंद्राने ता. 8 नोव्हेंबरला एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी आणून आर्थिक सर्जिकल स्ट्राईक केले. त्यामुळे काळा पैसाधारकांना या निर्णयाचे सर्वाधिक चटके हवालात गुंतलेल्यांना बसत आहेत. दिवाळीनंतर लगेचच हा निर्णय झाल्याने तब्बल पंचवीस दिवसांपासून हवाला बंद असल्याची माहिती प्राप्त झाली. 

या क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात प्रामुख्याने औरंगाबाद, जालना आणि नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात हवालाद्वारे व्यवहार होतात. त्यासह बीड, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे दुसऱ्या राज्याच्या सीमारेषेवर आहेत. दिवाळी पाडव्यापर्यंत हवाला व्यवसाय सुरू होता. त्यानंतर तीन दिवस हवाला व्यवसाय सुरू झाला होता. मात्र, पुन्हा एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याचा निर्णय केंद्राने घेतला तेव्हापासून हवाला व्यवसायातील सर्व व्यवहार बंद असल्याचे सांगितले जात आहे. नोटा बदलून घेणे आणि डिपॉझिट करण्यासाठी केंद्राने ठोस उपाययोजना केल्याने सहजासहजी या नोटा बदलून मिळणे अशक्‍यप्राय झालेले आहे. त्यामुळे पुढील काही महिने हा व्यवसाय बंदच राहील, अशी चिन्हे आहेत. 
मराठवाड्यात सध्या नगर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर नोटा बदलून घेण्यासाठी कार्यकर्ते वापरले जाऊ शकतात. त्याशिवाय मजूरवर्गातील लोकांचा नोटा बदलून घेण्यासाठी वापर केला जाऊ शकतो, अशी शक्‍यता सूत्रांनी व्यक्‍त केली आहे. 

प्राप्तिकराची राहू शकते नजर 
संशयितरीत्या ज्या खात्यांवर अडीच लाखापेक्षा कमी रक्‍कम जमा झालेली आहे, त्या खात्यांसंदर्भात रक्‍कम कुठून आली, यासंदर्भात प्राप्तिकर विभागातर्फे विचारणा होऊ शकते, अशी शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. 

Web Title: ban note