प्लॅस्टिक विक्रेत्यांचा बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

औरंगाबाद - प्लॅस्टिक बंदीची शहरात सोमवारपासून (ता. २५) अंमलबजावणी सुरू झाली. यात आपल्यावर कारवाई होईल, या भीतीपोटी प्लॅस्टिक विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली. यामुळे शहरातील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होती. याविषयी आम्ही कोणत्या प्रकारच्या प्लॅस्टिकची विक्री करू शकतो, याची विचारणा महापालिकेकडे केली आहे. त्यांच्याकडून उत्तर येणे अपेक्षित असल्याचे प्लॅस्टिक शॉप असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश भुतडा यांनी सांगितले. 

शहरात २५ प्लॅस्टिक विक्रेते आहेत. त्यांची महिन्याकाठी एक ते दीड कोटींची उलाढाल आहे. सोमवारपासून त्यांचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. त्यांच्याकडे काम करणाऱ्यांना दुसरे काम पाहावे लागले. याविषयी श्री. भुतडा म्हणाले, की महापालिकेने सरसकट प्लॅस्टिक बंदी केल्याने कोणते प्लॅस्टिक विक्री करावे आणि कोणते करू नये याबाबत संभ्रम आहे. दुकान उघडले तर कारवाई होईल अशी भीती आमच्यात होती. त्यामुळे आम्ही दुकाने बंद ठेवली. हा निर्णय म्हणजे व्यापाऱ्यांना लंगडे करण्याचा प्रकार आहे. बाजारपेठेत सर्वत्र प्लॅस्टिक बंदीमुळे भीतीचे वातावरण आहे. यामुळे २५ पैकी एकही दुकान उघडे नव्हते. 

नॉनव्हेल फॅब्रिक बॅगलाही बंदी 
कापडी पिशवी म्हणून नागरिक नॉनव्हेल फॅब्रिक बॅगचा वापर करीत आहेत; मात्र ही बॅग प्लॅस्टिकमध्ये मोडते. यामुळे महापालिकेतर्फे या बॅग वापरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. ही बॅग कापडी पिशवी असल्याचा दावा अनेकजण करीत आहेत. मात्र, याविषयी जनजागृती नसल्याने नागरिक या बॅगाही दुकानांवरून विकत घेत आहेत. आम्ही दोन दिवसांपूर्वीच बंदी झालेल्या प्लॅस्टिकप्रमाणे यांचीही विक्री बंद केली होती आणि ग्राहकांना पटवून दिले, असेही श्री. भुतडा यांनी सांगितले.

Web Title: ban for plastic