लॉकडाउनमध्ये ‘विरले’ वाजंत्र्यांचे सूर; कलाकारांवर आली उपासमारीची वेळ

file photo
file photo

सोनपेठ (जि.परभणी) : कुठल्याही समारंभात वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांना मोठी मागणी असते. लग्नसराईत तर या कलाकारांच्या तारखा मिळणे मोठे मुश्किल असते. परंतू, पंचेचाळीस दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे या शेकडो कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या राज्यातील हजारो बँड कलाकारांना सरकारच्या वतीने आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे. 
लग्नसमारंभात, निवडणुकीच्या जंगी मिरवणुकीत, छोट्या मोठ्या घरगुती समारंभापासून प्रत्येक ठिकाणी बँड वाजवणाऱ्या कलाकारांची आवश्यकता असते. लग्न समारंभामध्ये वऱ्हाडी मंडळींचा जोश वाढवण्याचे काम हे कलाकार करतात. काही हजारांपासून अगदी लाखो रुपयांपर्यंत या कलाकारांची बिदागी असते. वर्षातील काही दिवसच यांना रोजगार उपलब्ध असतो. या काही दिवसांच्या रोजगारावरच या कलाकारांना आपले कुटुंब वर्षभर चालवावे लागते. या लॉकडाउनमुळे एका छोट्या बँड पथकाचे साडेचार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एका पथकात दहा ते बारा कलाकार असतात. या कलाकारांना वर्षाकाठी चाळीस ते साठ हजार रुपये मानधन आपली कला दाखवण्यासाठी मिळते. परंतु या वर्षी ऐन लग्नसराईच्या काळात लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे कुठलेही काम मिळाले नाही. किंबहुना या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्यामुळे या बँड कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. 

हेही वाचा : युवकाने मदतीतून श्रमजिवी लोकांचा स्वाभिमानही जपला, कुठे ते वाचा...

कलाकार आता शेतात करतात काम 
बँड पथक बंद पडल्यामुळे या पथकातील कलाकारांना नाईलाजाने शेतात मजुरीला जावे लागत आहे. आपल्या नाजूक बोटांनी ट्रेमपोलिन वाजवणारे हात आता शेतात पल्हाट्या उपटत आहेत. बँड पथकातील कलाकारांना लोकांच्या शेतात रोजंदारीवर काम करावे लागत आहे. कधीही बँड शिवाय मजुरीची सवय नसणाऱ्या या कलाकारांना अंगमेहनतीची कामे करावे लागत आहेत. ऐन हंगामात दररोज पाचशे रुपये कामावणाऱ्या बँड कलाकाराला आता दिवसाकाठी केवळ शंभर रुपये मिळवण्यासाठी दिवसभर उन्हातान्हात कस्ट करावे लागत आहेत. तसेच हे काम देखील मोठ्या मुश्किलीने मिळवावे लागत आहे. 

 आर्थिक मदत करावी
लॉकडाउनमध्ये बँड पथकातील कलाकारांच्या हाताला काम नसल्यामुळे पथकातील पंधरा जनांच्या कुटुंबाची जबाबदारी आता मालकावर अली आहे. या लॉकडाउनमुळे यावर्षी होणारी तब्बल तीन ते चार लाख रुपयांची कमाई बुडाली. आमच्या सर्वच कलाकारांना जगवण्यासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शासनाने बँड पथकांना आर्थिक मदत करून सहकार्य करावे.
-संजय बनसोडे, बँड पथक चालक, सोनपेठ
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com