दोन बांगलादेशींची लातुरात चौकशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

लातूर - बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून भारतात येऊन तीन दिवस लातूरमध्ये वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून बांगलादेशचे चलन, बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड जप्त करण्यात आले आहे. त्यांना रविवारी येथील न्यायालयासमोर उभे केले असता, दहा जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या बांगलादेशींच्या चौकशीसाठी नांदेड येथील दहशतवाद विरोधी पथक शहरात दाखल झाले असून या दोघांचा दहशतवाद्यांशी संबंध आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.
Web Title: Bangaladesh People Inquiry crime