सिडको उड्डाणपूलाच्या नामकरण सोहळ्यात बंजारा परिषदेचा गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत गोंधळ घातला. या उड्डाणपुलास हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची लावून धरत त्यांनी निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी तीसहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

औरंगाबाद - सिडको येथील वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपूलास स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे नाव देण्याच्या कार्यक्रमात रविवारी (ता. 27) राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत गोंधळ घातला. या उड्डाणपुलास हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची लावून धरत त्यांनी निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी तीसहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

सिडकोतील उड्डाणपूलास वि. दा. सावकर यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेत घेण्यात आला. वि. दा. सावरकर यांच्या जयंतीदिनीच उड्डापूलाच्या नामकराचा कार्यक्रम ठेवण्यात आला. सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रम सुरु होण्यापुर्वीच राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन घोषणाबाजी केली. उड्डाणपुलास वसंतराव नाईक यांचे नाव देण्याच्यी मागणी यावेळी करण्यात आली. महापौर नंदकुमार घाडेले यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

यांनतर उड्डाणपुलाचा नामकरण सोहळा पार पडला. योवळी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, आमदार संजय सिरसाट, उपमहापौर विजय औताडे, गजानन बारवाल, विकास जैन, मकरंद कुलकर्णी, सचिन खैरे, किशनचंद तनवाणी, माजी महापौर भगवान घडामोडे, माधुरी देशमूख, राजू वैद्य, अनंद तादुळवाडीकर, सत्यभामा शिंदे, भाऊसाहेब जगताप, बाळासाहेब गायकवाड, सिंकदर आली, एस. डी. पानझडे उपस्थित होते. 

उड्डाणूपल तयार झाला तेव्हाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचे ठरले होते. त्यानंतर महापालिकेत या विषयी ठराव झाला. या ठरावास अनुमोदन देणारे विविध समाजातील लोक आहेत. यामूळे आम्ही दोन्ही महापुरुषांचा तेवढाच आदर करतो. राष्ट्रीय बंजारा परिषद आणि गोर सेनेच म्हणणे आम्ही ऐकूण घेतले. उड्डाणपूलावर वसंतराव नाईक चौक आणि स्वातंत्र्यवीर वि.दा.सावकर उड्डाणपूल असे दोन्ही नावे ठळकपणे लिहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. लवकरचे हे काम करण्यात येईल. 
- नंदकुमार घोडेले, महापौर, औरंगाबाद

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The Banjara Parishad has messed up at the CIDCO Naming Ceremony