बॅंकांना सुटी, एटीएम बंद असल्याने गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

लातूर- शासनाकडून कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात असूनही बॅंकांतील व एटीएमवरील गर्दी हटलेली नाही. शनिवारपासून (ता. 10) सलग तीन दिवस बॅंकांना सुट्या आहेत. अनेक ठिकाणचे एटीएम महिनाभरापासून उघडलेले नाहीत. बहुतांश वेळ एटीएम बंदच राहत आहेत. परिणामी सामान्यांना पैशांची चणचण जाणवत आहे. बॅंकांना सुटी व एटीएम बंद राहत असल्याने सामान्यांना कॅश मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केल्यापासून बाजारपेठा थंड आहेत. खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार ठप्प आहेत. या प्रसंगाला तोंड देताना सामान्य नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. दुकानांमध्ये ग्राहक नसल्याने व्यापारी निवांत बसून वेळ घालवत आहेत. सराफा बाजारात तर अजिबात ग्राहक येत नसल्याचे सांगितले जात आहे. अडत बाजारात व्यापाऱ्यांनी धनादेश किंवा उधारीने व्यवहार सुरू केले आहेत; मात्र शेतकऱ्यांना रोकड हवी असल्याने समस्या आहेत. विशेषतः ग्रामीण नागरिकांत अजूनही गोंधळाचे वातावरण आहे.

बॅंका व पोस्ट कार्यालयात पैसे जमा करणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. बाजारात अनेक व्यापाऱ्यांनी कॅशलेस व्यवहार सुरू केले आहेत. स्वाईप मशीन, क्रेडिट व डेबिट कार्ड, यूपीआय- पेटीएम स्वीकारले जाईल, असे फलक लावले गेले आहेत. मात्र, अजूनही आर्थिक उलाढालींना गती आलेली नाही. सामान्य व्यक्ती गरजेपुरते साहित्य खरेदी करून जास्तीत जास्त पैसे स्वतःकडे शिल्लक ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. बॅंकांकडे पुरेसे चलन उपलब्ध नसल्याने ग्राहकांना आवश्‍यक पैसे मिळत नाहीत. बहुतांश बॅंकांच्या कार्यालयाजवळचे एटीएम वगळता इतरत्र पैसे उपलब्ध नाहीत. त्यातही फक्त दोन हजारांच्या नोटा मिळत असल्याने सुट्या पैशांची समस्या कायम आहे. या परिस्थितीत शनिवारपासून सलग तीन दिवस बॅंकांना सुटी आहे. अनेक ठिकाणचे एटीएम बंद असल्याने ठराविक एटीएमवर ग्राहकांच्या रांगा आहेत.

Web Title: bank, atm closed