बॅंकांसमोरील गर्दी ओसरली एटीएममध्ये पैसे आले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटाबंदीनतर काही बॅंकांच्या शाखा वगळता बहुतांश ठिकाणची गर्दी ओसरली आहे. एटीएममध्ये पैसे असल्याने एटीएमवरील रांगाही कमा झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारपासून (ता.25) आता बॅंकेत फक्त जुन्या नोटा जमा करून घेतल्या जाणार आहेत.

शहरातील बॅंका आणि एटीएमसमोर 8 नोव्हेंबरपासून रांगा लागल्या होत्या. नोटाबंदीच्या निर्णयानंतर 15 दिवसांनी बहुतांश नागरिकांनी जुन्या नोटा बॅंकेत जमा केल्या आहेत. त्यामुळे बॅंकेतील गर्दी कमी झाली आहे. पैसे काढण्यासाठी 24 हजारांची मर्यादा कायम आहे, तर एटीएममधून अडीच हजार रुपयेच काढता येतात. शहरातील अनेक एटीएमध्ये पैसे आल्याने सध्या बॅंकांमधील गर्दी ओसरली आहे. फक्त स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद बॅंकेच्या शाखांमध्ये गर्दी दिसते. मात्र ही गर्दी फक्त नोटा जमा करण्यासाठीची आहे. ज्यांना पैसे आवश्‍यक आहे ते एटीएमचा वापर करताना दिसत आहेत.

पाचशेच्या नोटांची प्रतीक्षा
शहरात दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध असल्या तरी अद्याप पाचशेच्या नोटा आलेल्या नाहीत. त्यामुळे बाजारातील चलन तुटवडा कायम आहे. दोन हजार रुपयांचे सुट्टे करण्यात अडचणी असल्याने बॅंकांमधून पाचशे रुपयांच्या नोटा मिळाल्या तर हा प्रश्‍न सुटेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Bank ATM in front of the crowd fled