बॅंक विलनीकरणाचा प्रस्ताव फेटाळला - सुरेश पाटील

प्रकाश बनकर
मंगळवार, 26 जून 2018

औरंगाबाद : देशभरात बॅंकांविषयीचे धोरण बदलत आहे. यामुळे अनेक सहयोगी बॅंकांचे स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये विलनीकरण झाले. या बॅंकोचे स्वत:चे अस्तित्वच नाहीशे झाले आहेत. सहकार क्षेत्रातही आता डगमगळू लागले आहेत. अशा परिस्थितीतही मराठवाड्यातील लातूर आणि औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंक मजबूत स्थितीत आहे. आम्हाला जालना ग्रामीण इतर बॅंकांनी विलनीकरणासाठी विचारणा केली मात्र आम्ही नकार देत त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी "सकाळ'ला सांगितले. 

पाटील म्हणाले, देशभरातील बॅंकाची परिस्थिती बिकट स्वरुपाची आहे. मात्र औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची परिस्थिती इतर बॅंकांच्या तुलनेत चांगली आहेत. या बॅंकेच्या संचालक मंडळात कॉंग्रेस,शिवसेना,भाजप यासह सर्व पक्षातील संचालक मंडळी असून ते सर्व सलोखा टिकवून आहेत. याच कारणामूळे आज बॅंक डोलाने उभी आहे. मध्यतरी बॅंक 114 कोटी रूपये तोट्यात गेली होती. हा तोटा आम्ही भरून काढत बॅंक नफ्यात आणली. यासह जालना ग्रामीण बॅंक आणि अन्य बॅंकांनी यांचे मध्यवर्ती बॅंकेत विलनीकरणाचा प्रस्ताव आणला होता. आमच्या बॅंकेचा जिल्ह्यात आवाका मोठा असल्यामूळे तेच काम खुप आहेत. यामूळेच आम्ही नकार दिल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले. श्री. रामकृष्ण गोदावरी उपास जलसिंचन योजना पुन्हा आम्ही कार्यन्वित केली आहे. नाबार्ड आणि महाराष्ट्र राज्य सरकारी बॅंकचे कर्ज होते.याचे पुर्ण पैसे व्याजसह बॅंकेने भरले. या योजनेमूळे वैजापुर-गंगापूर तालुक्‍यातील नऊ ते दहा गांवातील 16 ते 17 हजार लोकांना प्रश्‍न सुटणार आहे. या योजनेसाठी शासनही मदत करीत आहेत. योजनेसाठी 5 कोटी 89 लाख रूपये शासनाने दिले आहेत. योजनेतून 100 कोटी रुपये लोकांकडून व्याजासह येणे आसल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

कॉंग्रेसने खुप दिले पक्ष बदलणार नाही 
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामूळे कॉंग्रेसह इतर पक्षातील लोक या पक्षात प्रवेश घेत आहे. या विषयी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश कराल काय असे विचारले असता. श्री. पाटील म्हणाले, कॉंग्रेस पेक्षाने मला नेतेपद दिले. मुलांला आमदारकी दिली. कॉंग्रेस खुप काही दिले. यामूळे भाजपने जाण्याचा प्रश्‍नच नाही. मी पक्ष बदलणार नसल्याचे यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: bank deletion rejects said suresh patil