हिंगोली जिल्ह्यात शॉर्ट सर्किटमुळे बँकेला आग

hingoli photo
hingoli photo

कुरुंदा(जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँकेला मंगळवारी (ता. दोन) सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या वेळी बॅंकेतील सगंणकांसह साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले. अग्निशमन दल व ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.

मंगळवारी सकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास बँकेतून धूर निघत असल्याचे ग्रामस्‍थ राजू पाटील यांच्या लक्षात आले. त्‍यांनी ही माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिली. तसेच वसमत येथील अग्निशमन दलालादेखील कळविले. त्‍यानंतर तातडीने घटनास्‍थळी अग्निशमन दल व बँकेचे कर्मचारी हजर झाले. त्यानंतर आग विझविण्यात आली.

मोठा अनर्थ टळला

 मात्र, तोपर्यत बँकेतील संगणक, फर्निचर आदी साहित्य जळून खाक झाले होते. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज बँकेचे कर्मचारी व्यक्त करीत आहेत. लागलेली आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. बाजूलाच इतरही बँकेच्या शाखा आहेत. सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी जोगदंड, बंडू राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बिट जमादार शंकर इंगोले तपास करीत आहेत.

आठ हजार वाहनांवर कारवाई

हिंगोली : शहरात लॉकडाउनच्या कालावधीत दुचाकी वाहनांना बंदी असताना त्‍याचे उल्‍लंघन करणाऱ्या आठ हजार ८७८ वाहनांवर दंडात्‍मक कारवाई करून चालकांकडून ३९ लाख ७१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिली.

वाहनचालकांवर दंडात्‍मक कारवाई

लॉकडाउनच्या कालावधीत दिवसाआड, तर कधी पाच दिवसांनतर भाजीपाला बाजार व किराणा दुकाने सुरू होती. या कलावधीत दुचाकी व चारचाकी वाहनास बंदी होती. त्‍याचे उल्‍लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्‍मक कारवाई करीत वाहने जप्त केली आहेत.

जिल्‍हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्‍लंघन 

(ता. ३१) मेअखेरपर्यंत वाहतूक शाखेने आठ हजार ८७८ वाहनांवर दंडात्‍मक कारवाई करून चालकांकडून ३९ लाख ७१ हजार सातशे रुपयाचा दंड वसूल केला आहे. तर दोन हजार ८४ वाहने जप्त केली असून जिल्‍हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्‍लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्‍मक कारवाई करण्यात आल्याचे श्री. चिंचोलकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com