बॅंक फसवणुकीची  लातूरलाच सुनावणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

औरंगाबाद - युनियन बॅंक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बॅंकेची तब्बल 49 कोटी तीस लाख रुपये फसवणूक केल्याप्रकरणी कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यासह तिघांविरोधात लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ती निलंगा सत्र न्यायालयात घेण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे यांनी फेटाळून लावली. 

युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या लातूर शाखेचे मुख्य व्यवस्थापक प्रवीणकुमार नाथ यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) "बॅंक सिक्‍युरिटीज अँड फ्रॉड सेल'कडे (मुंबई) तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात अरविंद दिलीप पाटील-निलंगेकर, संभाजी पाटील-निलंगेकर आणि तात्या धुमाळ यांनी बनावट कागदपत्रे बॅंकेला सादर केली. संभाजी पाटील-निलंगेकर हे यात जामीनदार आहेत. त्यांच्या मालमत्तेच्या आधारेच बॅंकेने कर्ज मंजूर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून समन्स काढण्यात आले. याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली. या विरोधात धुमाळ यांनी लातूर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. 

Web Title: Bank fraud case