चौथ्या दिवशी बॅंकांत गर्दी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

कुठे दहा, तर कुठे मिळाले 24 हजार
औरंगाबाद - सलग तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरातील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंका मंगळवारी (ता. 13) उघडल्या. बॅंका उघडण्यापूर्वीच लवकरात लवकर आपला नंबर लागण्यासाठी खातेधारकांनी रांगा लावल्या होत्या. करन्सी चेस्टमध्ये अडीचशे कोटी रुपये आल्याने काही बॅंकांनी खातेधारकांना 10 ते 24 हजार रुपयांची रक्‍कम दिली.

गेल्या आठवड्यात दोन टप्प्यांत स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या करन्सी चेस्टमध्ये अडीचशे कोटी रुपये आले. या करन्सी चेस्टच्या पैशातून राष्ट्रीयीकृत बॅंकांना दहा ते पंचवीस कोटी रुपये देण्यात आले. त्यामुळे मंगळवारी काही प्रमाणात का होईना, खातेधारकांना दिलासा मिळाला. एरव्ही दोन ते पाच हजार रुपये देणाऱ्या बॅंकांनी ही रक्‍कम वाढवून आपल्या खातेधारकांना दिली. मात्र, एटीएम अद्यापही बंद अवस्थेत असल्याने पैसे काढण्यासाठी लोकांनी बॅंका गाठल्या. त्यामुळे प्रामुख्याने शहागंज, औरंगपुरा, टीव्ही सेंटर आणि सिडको परिसरातील बॅंकांमध्ये खातेधारकांची गर्दीच गर्दी होती. पण अडीचशे कोटी रुपयांमध्ये दोन ते तीन दिवस व्यवहार करणे बॅंकांना शक्‍य आहे. त्यापूर्वी रिझर्व्ह बॅंकेकडून पैसे आल्यास फायद्याचे राहील, असे बॅंक अधिकाऱ्यांना वाटते.

Web Title: bank rush in aurangabad