बँकांसमोर नोटांगण!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - बुधवारी मध्यरात्रीपासून हजार-पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी जुन्या  हजार-पाचशेच्या नोटांचा भरणा करणे आणि पैसे काढण्यासाठी बँकांसमोर हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. रविवारी रोख रकमेअभावी खातेधारकांना बँकांसमोर `नोटांगण` घालावे लागल्याची प्रचिती आली.

औरंगाबाद - बुधवारी मध्यरात्रीपासून हजार-पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी जुन्या  हजार-पाचशेच्या नोटांचा भरणा करणे आणि पैसे काढण्यासाठी बँकांसमोर हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. रविवारी रोख रकमेअभावी खातेधारकांना बँकांसमोर `नोटांगण` घालावे लागल्याची प्रचिती आली.
राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांमध्ये असलेली रोख शुक्रवारी आणि शनिवारी संपण्याच्या मार्गावर होती. रविवारी बॅंका सुरू ठेवायच्या असल्यास रिझर्व्ह बॅंकेकडून रोख रक्‍कम येण्याची अपेक्षा औरंगाबादकर आणि बॅंक अधिकाऱ्यांना होती. ही अपेक्षा फोल ठरली. दोन दिवस कशीबशी अडीचशे कोटींच्या आसपास रोख रक्‍कम बदलून व रोख दिली. मात्र, रविवार हा खरा कसोटीचा दिवस ठरला. रविवारी रोख रक्‍कम नसल्याने खातेधारकांचा सामना करणे बॅंकींना अवघड झाले होते. प्रामुख्याने शहागंजमधील स्टेट बॅंक ऑफ हैद्राबादमध्ये हजारोंच्या संख्येने गर्दी पैसे जमा करणे आणि काढण्यासाठी जमा झाली होती. गर्दीला आवर घालण्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न बॅंक व्यवस्थापनाकडून झाले नाही. त्यामुळे एकाच रांगेत सर्वांना उभे राहावे लागल्याने गर्दीचा रोष तिसऱ्या दिवशीही कायम होता. विशेषत: वयोवृद्ध खातेधारकांना तासन्‌तास चार-चार वेळा रांगेत उभे राहूनदेखील पैसे मिळाले नाहीत. त्याचप्रमाणे बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, आयसीआयसीआय बॅंक, ॲक्‍सिस बॅंक, एचडीएफसी, आयडीबीआय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, देवगिरी नागरी सहकारी बॅंक आणि पंजाब नॅशनलसह अनेक बॅंकांमध्ये केवळ रांगाच रांगा बघायला मिळाल्या. निम्म्याहून अधिक खातेधारकांना पैसे न घेताच घरी परतावे लागले.

रोखीबद्दल बॅंकांमध्ये संभ्रम?
रविवारी करंसी चेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे येण्याची शक्‍यता बॅंक अधिकाऱ्यांनी वर्तवली होती. मात्र, औरंगाबादमध्ये एकही रुपया आला नाही. सोमवारी बॅंका बंद असल्याने मंगळवारी कॅश येणार की नाही? याबाबत कुठल्याही प्रकारची स्पष्टता नसल्याने बॅंकांमध्ये रोख रकमेचे काय करावे? याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.

Web Title: bank rush for currency