जालन्यात बॅंकफोडीचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

शहरातील गांधी चमन येथील भारतीय स्टेट बॅंक (एसबीआय) शाखेच्या शटरचे व गेटचे कुलूप तोडून बॅंकफोडीचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार रविवारी (ता.14) मध्यरात्रीनंतर घडला. एक संशयित बॅंकेच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. बॅंकेने सुरक्षारक्षक न नेमल्यामुळे हा प्रकार घडला.

जालना - शहरातील गांधी चमन येथील भारतीय स्टेट बॅंक (एसबीआय) शाखेच्या शटरचे व गेटचे कुलूप तोडून बॅंकफोडीचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार रविवारी (ता.14) मध्यरात्रीनंतर घडला. एक संशयित बॅंकेच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. बॅंकेने सुरक्षारक्षक न नेमल्यामुळे हा प्रकार घडला.

गांधी चमन येथे भारतीय स्टेट बॅंकेची शाखा आहे. या बॅंकेच्या वेळेत सुरक्षारक्षक असतो, मात्र रात्रीच्या वेळी बॅंकेकडून सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. याचाच फायदा घेत रविवारी (ता.14) मध्यरात्रीनंतर चोरट्याने बॅंकेच्या शटरसह चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
त्यानंतर या चोरट्याने बॅंकेतील लॉकर फोडण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्याला लॉकर फोडता आले नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

शहरातील अनेक बॅंकांसह एटीएममध्ये सुरक्षारक्षक नसल्याने सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मात्र बॅंकांकडून सुरक्षारक्षक नेमण्यात चालढकल केली जात असल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bank Theft Trying In jalana Crime