दहशतवाद्यांनी घेतला होता सोशल मीडियाचा आधार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

औरंगाबाद - ‘एटीएस’ने अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांनी ‘इसिस’च्या कार्याचा प्रसार-प्रचार करण्यासाठी मोठी खबरदारी घेत सोशल मीडियाचा आधार घेतल्याची बाब तपासात समोर आली आहे. 

मुंब्रा येथील संशयित दहशतवादी मोहसीन खान हा त्याच्या साथीदारांसह औरंगाबादेत राहण्यासाठी आल्याची माहिती ‘एटीएस’ला ता. २४ डिसेंबर २०१८ च्या एका प्रकरणात मिळाली होती. तेव्हापासून त्यांच्या हालचालींवर तपास यंत्रणेने लक्ष होते. 

दरम्यान, मोहसीन व त्याच्या साथीदारांनी ‘उम्मत-ए-मोहम्मदिया’ नावाचा ग्रुपही तयार केला होता. त्यातही अत्यंत खबरदारी घेऊन विश्‍वासातील व समविचारी व्यक्तींनाच सामाविष्ट करण्यात आले होते. या ग्रुपचे सदस्य हे ‘इसिस’च्या विचारांनी प्रेरित असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. दरम्यान, पोलिसांनी संशयितांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्‍लेषणही केले. त्यानंतर मुंब्रातील संशयितांना बुधवारी (ता.२३) सकाळी औरंगाबादच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आणण्यात आले. 

२३ सिमकार्ड, 6 हार्डडिस्क जप्त 
हायड्रोजन पॅरॉक्‍साईडने भरलेल्या १०० मिलीच्या प्लॅस्टिक बाटल्या, फिनेल अशा घातक रसायनांसह लाईटचे होल्डर, सेल, १३ ग्लोव्हज आदी आक्षेपार्ह वस्तू आरोपीच्या घरात आढळून आल्या होत्या. या वस्तूंचा पंचनामा केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केली. त्यामुळे संशयित दहशवाद्यांविरोधात भादंवि १२० (ब), यासह कलम १८,२०, ३८, ३९, बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक कायदा) १९६७ सुधारणा, २००४, २००८ सह १३५ महाराष्ट्र पोलिस कायदा १९६७, सुधारित २००८ नुसार मुंबईतील काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Web Title: The basis of the social media was taken by the terrorists