औरंगाबादेत सौम्य लाठीमार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने मराठा समाजाने मोठ्या संख्येनी रस्त्यावर उतरत मंगळवारी (ता. 31) चक्‍का जाम आंदोलन केले. या वेळी संतप्त आंदोलकांनी मागण्यांसोबतच सरकारविरुद्ध दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्यार्थी आणि रुग्णवाहिकेला तातडीने रस्ता मोकळा करून देत आंदोलनकर्त्यांनी वेगळेपणही जपले. राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप करीत परिसर स्वच्छ करण्याचे कामही स्वयंसेवकांनी केले. पोलिसांनी शहरात तीन ठिकाणी सौम्य लाठीमार केला. तसेच, 65 जणांना अटक केली. 

कोपर्डीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत, यामुळे संतापलेल्या मराठा समाजातर्फे 31 जानेवारीला राज्यव्यापी चक्‍का जामची हाक देण्यात आली होती. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून गावपातळीवर याचे नियोजन करण्यात आले होते. औरंगाबाद शहर परिसरात नऊ ठिकाणी सकाळी नऊपासून आंदोलक एकत्र येण्यास सुरवात झाली. चक्‍का जाममुळे कार्यालयात जाण्यास अडचण निर्माण होईल म्हणून बहुतांश सरकारी कर्मचारी नऊपासूनच घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी कार्यालयासमोरील चौकात पोलिस आयुक्‍तांनी आंदोलकांना अचानकपणे गाडीत बसविल्याने संताप व्यक्‍त करण्यात आला. पोलिस अधिकाऱ्यांनी वारंवार विनंती करूनही रस्त्याच्या बाजूला थांबलेले तरुण तेथून जाण्यास तयार नव्हते. दरम्यान, समाज बांधवांनी मध्यस्थी करत तरुणांना शांत केले. 

Web Title: Baton in aurangabad