हर्सूल कारागृहात सापडल्या बॅटरी, मोबाईल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

औरंगाबाद : नाशिक येथील कारागृहात सापडलेले मोबाईल तसेच कोल्हापूर कारागृहात पिस्तूल सापडल्यानंतर हर्सूल कारागृहातही एक मोबाईल व दोन बॅटरी सापडल्या. यामुळे एकच खळबळ उडाली. विशेषत: काही महिन्यांपूर्वीच कारागृह प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्यानंतर गुरुवारी (ता. 13) हा प्रकार उजेडात आल्याने कारागृह प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. 

हर्सूल कारागृहातून गॅंग ऑपरेट केली जाते. आत लॉबिंग चालते. विडी, सिगारेटचा पुरवठा होतो. याबाबत बऱ्याच चर्चा समोर आल्यानंतर कारागृहात चक्क मोबाईल व दोन बॅटरी सापडल्याचा प्रकार उघडकीस आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातील सर्कल सोळामध्ये गुरुवारी सायंकाळी पाच ते साडेपाचदरम्यान बेवारस मोबाईल आढळून आला. याबाबत सर्कलमधील एका खबऱ्यानेच माहिती दिली होती. पांढऱ्या रंगाचा सीमकार्ड नसलेला मोबाईल तसेच सॅमसंग कंपनीच्या दोन बॅटरी सापडल्या. 

कारागृहातूनच मदत 
मोबाईल कारागृहातील सुरक्षाव्यवस्था भेदून बॅटरी आणि मोबाईल आत कसा आणला गेला यावर कारागृह प्रशासनही अचंबित आहे; परंतु कारागृहातील अथवा प्रशासनातील व्यक्तींची याला साथ असण्याची शक्‍यता असल्याचा संशयही सूत्रांनी व्यक्त केला. याचा तपास करावा, असे पत्रही हर्सूल पोलिसांना कारागृह प्रशासनाने दिले. 

सायबरची मदत 
हर्सूल कारागृह सायबर पोलिसांची मदत घेत आहे. कारागृहातील मोबाईलवरून संपर्क झाला का, कुणा-कुणाला संपर्क झाला. याची माहिती कारागृह सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्‍यक असल्याची सूत्रांनी माहिती दिली. 

Web Title: Batteries, Mobiles found at Harsul Jail Aurangabad