लग्नात मिरवताय, सावधान! 

thief
thief

औरंगाबाद : लग्नात शुभमंगल सावधान...असे मंजूळ स्वर कानी येतात. सर्व काही शुभ घडो, मंगलमय होवो हीच भावना असते; परंतु लग्नसमारंभात सावधान राहण्याची वेळ आली आहे. आलिशान असो की, सर्वसाधारण लग्नसमारंभ, चोरटे मात्र हैदोस घालत आहेत. लग्नातून लाखोंची रोकड, दागिने लंपास झाल्याचे प्रकार घडल्याने आता सजूनधजून मिरवतानाही सावध, सजग राहणे गरजेचे झाले आहे. 

लग्न म्हटलं की, आनंदाची पर्वणीच म्हणा. बेभान होऊन केलेला नाच असो की फोटोसेशनची धुंद; पण या आनंदावरही दुखा:चे विरजण पडू शकते. लग्नसमारंभात रुचकर भोजनावर ताव मारण्यासाठी आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी "बिन बुलाये मेहमान' अवतरतात. ही नवीन बाब नाही. कृश बांधा, गलिच्छ कपडे आणि न पाहावणारा अवतार अशीच आपली मनोमन जणू चोरांची व्याख्या. चोर म्हटलं की तसाच चेहरा डोळ्यांसमोर उभा राहणार; पण हे आता विसरावं लागेल; कारण विवाह समारंभात चक्क हायप्रोफाईल व पाहणाऱ्यांना जवळचा नातेवाईक वाटावे म्हणून चोर आता चमकदार कपडे घालून स्वत:च्या लाईफ स्टाईलकडेही लक्ष देऊ लागले आहेत. 

पाहुण्यांपेक्षा उठावदार पेहराव 
नवऱ्या मुलीचे नातलग व वरबापापेक्षाही उठावदार अन्‌ पाहुण्यांनी पाहतच राहावं, असा पेहराव लग्नात अवतरलेले चोर परिधान करतात. त्यामुळे अशांसोबत कुणालाच चौकशी करण्याचे धाडस होत नाही, की कुणी उलटप्रश्‍नही करीत नाही. कुणी विचारलेच तर हे चोर स्वयंघोषित नातलग भासवून डल्ला मारीत असल्याचेही समोर आले आहे. 

दागिने अन्‌ आहेराची रक्कमही गेली 
कैलास गंगाराम चाटसे व्यावसायिक असून एकनाथनगर येथे राहतात. त्यांच्या मुलीचे 23 डिसेंबरला रिंगल लॉन्स येथे लग्न होते. त्यांच्या पत्नी समारंभात फोटोसेशनमध्ये दंग होत्या. फोटो काढण्यासाठी त्यांनी त्यांची पर्स बाजूला ठेवली. हीच बाब हेरून चोराने नकळत पर्स लंपास केली. त्यातील रोख 50 हजार, आहेराचे 84 हजार 700 रुपये, सहा ग्रॅम सोन्याची साखळी असा एक लाख 64 हजार 700 रुपयांची रक्कम चोराने लांबविली. 

मागील तीन घटना 
-23 डिसेंबर : सिडको, एन- 2, मुकुंदवाडी येथील एका मंगल कार्यालयात लग्नसमारंभात फोटो काढण्यात पाहुणी महिला मग्न होती. त्यांची सोफ्यावर ठेवलेली पर्स व पाच हजार रुपये मिनिटभरातच चोराने लांबविले. 
-23 डिसेंबर : तेच ठिकाण : 
भूमी अभिलेख, जिल्हा अधीक्षक हे मुकुंदवाडीतील एका मंगल कार्यालयात लग्नसमारंभासाठी रविवारी गेले होते. तेथे गर्दीत चोराने त्यांच्या खिशातील आयफोन लंपास केला. 
-3 डिसेंबर : जाबिंदा लॉन्स येथे एका व्यावसायिकाच्या मुलीचे लग्न होते. नववधूचे तब्बल 30 तोळे सोन्याचे दागिने चोरांनी लंपास केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com