विधानसभेच्या तयारीला लागा : प्रकाश आंबेडकर

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 5 जून 2019

नांदेड : वंचित बहूजन आघाडीने पहिल्याच लोकसभा निवडणुकीत औरंगाबादची जागा जिंकून यश मिळविले. तसेच कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाणीपत केले. लोकसभा निवडणूकीत राज्यात सर्वच ठिकाणी तिसऱ्या व दुसऱ्या क्रमांकावर पक्षाने आपली पकड मजबुत केली. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी कामाला लागा असे आवाहन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर अॅड. प्रकाश आंबेडकर हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता ते आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलत होते. मंगळवारी (ता. चार) रात्री आठच्या सुमारास ते नांदेडात दाखल झाले. बुधवारी (ता. पाच) सकाळी शासकिय विश्रामगृहात त्यांनी आपल्या सर्व वंचीत बहुजन आघाडी व भारीप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकसभा निवडणूकीत सर्वांनीच खून चांगले काम केले. त्याबद्दल त्यांनी कौतूक केले. राज्यातील मस्तवाल झालेले कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसचे पाणीपत करता आले. अनेक प्रस्थापीतांना धक्का दिला. अनेकजण राजकिय प्रवाहाबाहेर पडले. अशीच ताकद येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत दाखवून वंचीत बहुजन आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडूण आणण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. 

तसेच रमजान ईदनिमित्त सर्व मुस्लीम बांधवांना बोलावून त्यांनी शुभेच्छा दिल्या. विधानसभेच्या प्रचाराची आखणी कशी असावी याबद्दल त्यांनी कार्यकर्त्याचे एेकूण घेतले. त्यानंतर सकाळी नऊ वाजता ते लातूरकडे रवाना झाले. अहमदपूर येथील शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची भेट घेणार असून त्यानंतर लातुर लोकसभेचे वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार राम गारकर यांच्या मातोश्रीचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या परिवाराचे ॲड. प्रकाश आंबेडकर सांत्वन करणार आहेत. यावेळी प्रा. यशपाल भिंगे, डॉ. संघरत्न कुऱ्हे, शाम कांबळे, मोहन राठोड, फिरोज लाला यांच्यासह आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: be ready for the assembly elections says Prakash Ambedkar to Party workers