विकास कामांच्या कारणावरुन आ. आर. टी. देशमुखांना धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

माजलगांव : जयंती कार्यक्रम आटोपून परतत असताना भाजप आमदार आर. टी. देशमुख यांना धक्काबुक्की करत त्यांच्या स्वीय्य सहाय्यकाचा मोबाईल फोडल्याची घटना बुधवारी (ता. 22) दुपारी तालुक्यातील राजेवाडी येथे घडली.

राजेवाडी येथे लोकशाहीर आण्णाभाउ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी देशमुख गेले होते. कार्यक्रम अटोपल्यानंतर परतण्यासाठी आमदार देशमुख आपल्या वाहनात बसले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामेश्वर थेटे, दिपक महागोविंद, भाउसाहेब पवार, माउली महागोविंद यांनी आमदार देशमुख यांची गाडी आडवुन ‘आमच्या गावात चार वर्षात एकही विकास काम का केले नाही’ असे म्हणुन त्यांना घेराओ घातला. गाडीतुन खाली खेचुन घेत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचे स्विय सहाय्यक श्री. पवार यांचा मोबाईल फोडला तसेच गाडीचालकाला देखिल धक्काबुक्की करण्यात आली. घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकासह पोलिस दाखल झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: beat mla r t deshmukh for development work