बीड जिल्ह्यात राडा - रेशन वाटपावरून दोन गटांत दे दणादण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

नांदलगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडे राशन मागण्यासाठी गेलेल्या दोन कुटुंबांना दुकानदार आणि त्याच्या परिवाराकडून लाकडी काठी आणि दगडाने मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

गेवराई (जि. बीड) - लॉकडऊनमुळे सामान्यांची अडचण लक्षात घेऊन सरकारने मुबलक व स्वस्तात धान्य उपलब्ध करुन दिले आहे. मात्र, दुकानादारांकडून त्यावर डल्ला मारला जात आहे. असाच प्रकार तालुक्यातील नांदलगावला घडल्याने दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. 

तालुक्यातील नांदलगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडे राशन मागण्यासाठी गेलेल्या दोन कुटुंबांना दुकानदार आणि त्याच्या परिवाराकडून लाकडी काठी आणि दगडाने मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. गेल्या चार दिवसापासून स्वस्त धान्य दुकानदार सुनील राऊत यांच्याकडे रेशनची मागणी होत होती, अनेक वेळा चकरा मारून देखील राशन न मिळाल्याने विष्णू गाडे, प्रभू गाडे या दोन भावंडांनी जाब विचारला असता स्वस्त धान्य दुकानदाराकडून चक्क काठीने मारहाण करण्यात आली. यावेळी दुकानदाराचे कुटुंब आणि नागरिकांत  मंगळवारी (त. २१) फ्री स्टाईल हाणामारी झाली.

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

दरम्यान स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध तलवाडा पोलिसात तक्रार देण्यात आली असून, मारकुट्या दुकानदारावर कसलीच कारवाई झाली नाही. यामुळे संबंधित अधिकारी देखील राशनमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्याच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील राशन दुकानदार स्वस्त धान्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याच्या तक्रारी आमदार पवार यांच्याकडे आल्या असून याची चौकशी करण्याचे आदेश दिले असता संबंधित अधिकारी कसलाच भ्रष्टाचार होत नसल्याचा अहवाल देत आहेत. 

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beating in Beed district in two groups

Tags
टॉपिकस
Topic Tags: