अतिरिक्त आयुक्तांच्या श्रीमुखात भडकावली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

औरंगाबाद - धोकादायक नाल्याने चोवीस तासांत गुरुवारी दुसरा बळी घेतला. सिडको एन-6 भागातील नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करत एकाने शुक्रवारी (ता. 22) सकाळी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या श्रीमुखात भडकावली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

जयभवानीनगरमध्ये नाल्यात वाहून गेल्याने भगवान मोरे यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला होता. या नाल्यातील अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह मोकळा करावा; अन्यथा एखाद्याचा जीव जाईल, अशी भीती व्यक्त करत नगरसेविका मनीषा मुंडे दोन वर्षांपासून मागणी करीत होत्या; मात्र महापालिकेच्या बेपर्वाहीमुळे मोरे यांना प्राण गमवावे लागले. एकाचा जीव घेतल्यानंतर तरी निर्ढावलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना जाग येईल, अशी अपेक्षा होती. मात्र चोवीस तास उलटत नाहीत तोच गुरुवारी रात्री दुसरा बळी गेला.

दोन वर्षांत दुसरा बळी
या नाल्यात पडून दोन वर्षांपूर्वी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही महापालिकेने उपाययोजना केलेली नाही. काही ठिकाणी नाल्यावर ढापे टाकण्यात आले आहेत, तर बहुतांश ठिकाणी नाला उघडा आहे. ज्या ठिकाणी चोपडे यांचा मृत्यू झाला तिथे कमरेपर्यंत नाला खोल आहे.

Web Title: beating to commissioner crime