'मैं हूँ डॉन' म्हणत निवासी डॉक्‍टरला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

औरंगाबाद  - रुग्णाच्या नातेवाइकांकडून घाटी रुग्णालयातील एका निवासी डॉक्‍टरला मारहाण झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. यानंतर घाटीतील निवासी डॉक्‍टरांनी रात्रीपासून "काम बंद' आंदोलन सुरू केले असून, बैठकांवर बैठका झाल्यानंतरही डॉक्‍टरांचा संप कायम होता. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. हर्षद चव्हाण असे मारहाण झालेल्या निवासी डॉक्‍टरचे नाव आहे. ते बुधवारी रात्री ड्युटीवर असताना एका रुग्णाला घेऊन नातेवाईक घाटी रुग्णालयात आले. त्यानंतर डॉ. चव्हाण यांनी त्या रुग्णाची तपासणी केली. वयोवृद्ध व प्रकृती क्षीण असल्याने रुग्णाला सलाईन देताना त्यांची नस लवकर सापडत नव्हती. यावर धीराने घेण्याऐवजी उपचाराला विलंब होत असल्याचा कांगावा करून रुग्णाच्या नातेवाइकांनी दोन-तीन वेळा डॉ. हर्षद यांच्या कानशिलात लगावली. ही बाब समजताच काही डॉक्‍टर व अन्य कर्मचारी जमा झाले. जमाव वाढत असल्याचे पाहून नातेवाइकांनी घाटीतून धूम ठोकली.
आम्ही डॉन आहोत, ओळखत नाही का?

नस शोधताना रुग्णाच्या नातेवाइकांचा गराडा झाल्याने चव्हाण यांनी मोजकेच लोक थांबण्याची सूचना केली होती. यावर, "मैं हूँ डॉन, ओळखत नाही का? तुम्ही कुणाला जाण्यास सांगत आहात,' असे रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉक्‍टरांना धमकावले. तसेच, डॉ. सुरेश हरबडे यांना धक्काबुक्की केली.

Web Title: beating to doctor crime