उमरग्यात अतिदक्षता विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण

उमरगा : उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मारहाणीचा केला निषेध
umarga
umargaumarga

उमरगा (उस्मानाबाद): उपजिल्हा रूग्णालयातील कोविड सेंटरमधील अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन सिलेंडर बाबत तक्रार करत कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारिकांना धमकावले व वार्डबायला मारहाण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी (ता. आठ) कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. अशोक बडे, कोविड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. विक्रम आळंगेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात रात्रपाळीला कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारिका व वार्डबायला कांबळेवाडी (ता.बस्वकल्याण) येथील दशरथ गोविंदराव कांबळे या रुग्णांच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन सिलेंडर बाबत तक्रार करत धमकावण्यात आले. वार्डबायला मारहाण करण्यात आली. हे प्रकरण अत्यंत धक्कादायक असून रुग्णालयीन कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारे आहे. यामुळे रुग्णालयीन सेवा देण्यास अत्यंत अडचणी निर्माण होत आहेत.

umarga
Heavy Rain: उमरग्यात अवकाळी पावसाचा तडाखा! वीज पडून दोन गाई दगावल्या

या प्रकरणात अधिकाऱ्यांनी लक्ष घालुन कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण करत दमदाटी, धमकी देणारे, मारहाण करणाऱ्या संबंधीत व्यक्तीवर योग्य ती प्रशासकिय कार्यवाई प्रस्तावित करावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com