'एमआयएम'च्या नगरसेवकाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत "बाबरी पाडल्याची घटना आम्ही अद्याप विसरलेलो नाही,' असे वक्तव्य करणारे "एमआयएम'चे नगरसेवक सय्यद मतीन यांना महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत बेदम मारहाण करण्यात आली. भाजपच्या एका नगरसेविकेने चपलेने चोप दिला; तर इतरांनी लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

या घटनेनंतर मतीन यांना सर्वसाधारण सभेत कायमस्वरूपी बंदी घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, तर नगरसेवकपद रद्द करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले. दरम्यान, मतीन समर्थकांनी महापालिका मुख्यालयाबाहेर भाजपच्या संघटनमंत्र्याच्या जीपवर हल्ला करीत चालकाला बेदम मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनी मांडला.

महापौरांनी श्रद्धांजलीपर मते मांडण्यासाठी नगरसेवकांना संधी दिल्यानंतर सय्यद मतीन उभे राहिले. त्यांनी "बाबरी मशीद पाडल्याची घटना आम्ही अद्याप विसरलेलो नाही,' असे सांगत "श्रद्धांजलीच्या प्रस्तावाला विरोध आहे,' असे वक्तव्य केले. त्यानंतर महापौरांसह भाजप नगरसेवकांनी, "भारतरत्न पदवी असलेल्या माजी पंतप्रधानांबद्दल बोलण्याची लायकी आहे का?' असा जाब विचारत मतीन यांना जाब विचारत लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. इतर नगरसेवकांनी व सुरक्षारक्षकांनी मतीन यांची सुटका करीत त्यांना सभागृहाबाहेर काढले.

Web Title: Beating to MIM Corporator in Aurangabad