Crime News : विवाहित महिलेच्या घरात घुसून मारहाण, विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beating molesting married woman Crime accused in jail police

Crime News : विवाहित महिलेच्या घरात घुसून मारहाण, विनयभंग

कन्नड : शहरातील राजवाडा,बडा बंगला येथील विवाहित महिलेच्या घरात घुसून ( ता.७) सायंकाळी पावणे चार वाजेच्या सुमारास मारहाण करून तिचा विनयभंग करण्यात आला.या प्रकरणी कन्नड शहर पोलिस ठाण्यात आरोपी खालीद नीम शेख याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कन्नड शहर पोलीस ठाण्यात पिडीत महिलेने फिर्याद दिली की तिचा पती खाजगी वाहनावर चालक आहे. सदरील महिला दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घरात स्वयंपाक करत होती व त्यांची मुलगी तिचे लहान मुलाला सांभाळत होती.

यावेळी त्यांच्याच गल्लीतील खालीद नईम शेख हा अचानक घरात घुसला आणि माझ्यासोबत तू का बोलत नाहीस? मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असे म्हणून माझ्या गालावर चापट मारली आणि माझे तुझ्यावर प्रेम असून मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे, या लग्नामध्ये कोणी अडथळा आणला तर मी तुझ्या नवऱ्याला पण जीवनाशी ठार मारून टाकेल असे धमकावून तिचा विनयभंग केला.

सदरील महिला जोर जोरात ओरडल्यानंतर माझी मुलगी व शेजारचे धावून आले.त्यांनी आरोपीस घराबाहेर काढले. या फिर्यादीवरून आरोपी खालीद नईम शेख यांच्याविरुद्ध कलम ३५४(अ),३५४,४५२,३२३,५०४,५०६ भादंवी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलिस निरिक्षक राजू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश जाधव यांनी आरोपीस तत्काळ अटक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश जाधव हे करत आहेत.

टॅग्स :policecrime