बीडमध्ये भीषण अपघात; दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू! : Beed Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beed accident

Beed Accident: बीडमध्ये भीषण अपघात; दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू!

बीडच्या अंबाजोगाई इथं भीषण कार अपघात झाला आहे. या अपघातात दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी सातपुते अशी या दोन डॉक्टरांची नावं आहेत. एका आरोग्य शिबिरावरुन घरी परतत असताना त्यांच्या कारला अपघात झाल्याचं कळतं आहे. (Beed Accident a terrible accident in Beed Two doctors died on the spot)

सुत्रांच्या माहितीनुसार, बीडच्या अंबाजोगाई इथं कारचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी सातपुते या दोन तरुण डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. दोघेही अडत इथं आरोग्य शिबिरासाठी गेले होते. तिथून परत अंबाजोगाईला परत येत असताना त्यांची कार सनई गावाजवळ झाडाला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दोन्ही डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. (Marathi Tajya Batmya)