बीड : दोन अंतिम मतदार याद्यांमुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ

आष्टी नगरपंचायत निवडणूक, प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
आष्टी नगरपंचायत निवडणूक
आष्टी नगरपंचायत निवडणूकSakal

आष्टी (जि. बीड) : एकाच प्रभागाच्या चक्क दोन-दोन अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याचा प्रताप निवडणूक विभागाने केल्याचा प्रकार आष्टी नगरपंचायत निवडणुकीत समोर आला आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र आहे. एकूण 17 पैकी 8 प्रभांगात ही गडबड झाल्याने नेमकी कोणती मतदार यादी अंतिम ग्राह्य धरावी, असा संभ्रम उमेदवारांमध्ये निर्माण झाला आहे. मतदारयाद्यांच्या या घोळामुळे ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या दुसर्याउ दिवशी इच्छा असूनही केवळ चार उमेदवारांना अर्ज सादर करता आले.

आष्टी नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, उमेदवारी अर्ज भरण्याची -- डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या टप्प्यावर आष्टीत बोगस मतदारांचा मुद्दा पुढे आला. पडताळणीत एकूण 459 मतदार बोगस आढळल्याचा अहवाल सहायक निवडणूक अधिकार्यांसनी जिल्हाधिकार्यांसना पाठविलेला आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांहनी निवडणूक आयुक्तांचे मार्गदर्शन मागविलेले असून, या निर्णयाकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे.

आष्टी नगरपंचायत निवडणूक
पुणे : शहर आणि परिसरात जोरदार पावसाला सुरूवात

बोगस मतदारांचा मुद्दा चर्चेत असताना आता अंतिम मतदारयादीचा नवा मुद्दाही उपस्थित झाला असून, त्यामुळे अर्ज भरताना उमेदवारांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या अंतिम मतदारयादीत नाव असेल तरच उमेदवाराला अर्ज भरता येतो. परंतु आष्टीतील एकूण 17 प्रभागांपैकी 8 प्रभागांमध्ये प्रशासनाकडून दोन अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यात अनेकांची नावे दुसर्या प्रभागात गेली आहेत. शिवाय उमेदवारांना अर्ज भरताना तांत्रिक अडचण येत आहे.

मी जरा कामात आहे, आष्टी नगरपंचायतीच्या 17 प्रभागांच्या अंतिम याद्या तुमच्या व्हॅटसअपवर पाठवतो.

- सुशांत शिंदे, प्रशासक, नगरपंचायत, आष्टी

काही तांत्रिक त्रुटींमुळे दोन अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या असल्या तरी दोन्ही अंतिम मतदारयाद्यांनुसार प्राप्त झालेल्या एकाही उमेदवाराचा अर्ज बाद होणार नाही. मतदारयादीमध्ये उमेदवाराचे नाव असल्यास असा अर्ज बाद ठरू शकत नाही.

-विनोद गुंडमवार, तहसीलदार, आष्टी

आष्टी नगरपंचायत निवडणूक
गुजरातने महाराष्ट्राला टाकलं मागे, उद्योगांसाठी सर्वाधिक पसंती!

दाखल करण्यात आलेले अर्ज

बुधवारी (ता. एक) - 1.

गुरुवारी (ता. दोन) - 3.

(चौकट)

अंतिम यादीनुसार तफावत

पडलेली मतदार संख्या

एक- 658, 659

दोन- 644, 635

तीन- 468, 467

चार- 853, 858

पाच- 467, 468

सहा- 482, 485

सात- 427, 428

सतरा- 404, 404

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com