लाच घेताना बीडचा बीडीओ जाळ्यात, सार्वजनिक विहीरींच्या देयकासाठी घेतले ३७ हजार

Beed Block Development Officer News
Beed Block Development Officer News

बीड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेतून खोदलेल्या सार्वजनिक विहिरींच्या खोदकामाचे देयक अदा करण्यासाठी ३७ हजारांची लाच घेताना गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यास लाच लुपचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी (ता.१७) रात्री रंगेहाथ पकडले. नारायण मिसाळ याच्याकडे बीड व पाटोदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदांचा पदभार आहे.


पाटोदा तालुक्यातील कंत्राटदार तक्रारदाराने पाटोदा तालुक्यात १० ते १२ सार्वजनिक विहिरींची खोदकामे केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून केलेल्या खोदकामांचे देयक अदा करण्याची मागणी कंत्राटदाराने गटविकास अधिकारी नारायण मिसाळ याच्याकडे केली. यासाठी मिसाळने ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत संबंधिताने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्यात तथ्य आढळल्याने पथकाने सापळा रचला. दरम्यान, तडजोडीअंती ३७ हजार रुपये देण्याचे ठरले. बुधवारी सायंकाळी बीड शहरातील चऱ्हाटा फाटा येथील स्वत:च्या घरी लाच स्वीकारताना पथकाने नारायण मिसाळ यास रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाच लुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com