बीड : बोगस कपाशी बियाणांचा कृषी विभागाने केला पर्दाफाश

दत्ता देशमुख
Tuesday, 9 June 2020

बोगस कापूस बियाणे विक्री करणाऱ्या रॅकेटचा बीड कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे. त्यामुळे बाजारपेठेत बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी जागृत होण्याची गरज निर्माण झाली आहे. 

बीड : देशभरात बंदी असलेले बॉडीगार्ड-बॉडीकॉट या बोगस कपाशी बियाणे विक्रीचा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. आठ) छापा टाकून पर्दाफाश केला. तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव व जिल्हा कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे यांनी एमआयडीसी भागातील व्यंकटेश अॅग्रो एजन्सी या दुकानातून ४६ पाकिटे जप्त करून विक्रेता केदार जाजू यास ताब्यात घेऊन पेठ बीड पोलिसांच्या हवाली केले.

हे ही वाचा : औरंगाबादचा वाढतोय कोरोना मीटर, आज ७२ रुग्ण सापडले, ७८० बाधितांवर उपचारही आहेत सुरू   

वास्तविक कपाशी पाकिटाची किंमत ७३० रुपये असताना येथील एमआयडीसी भागातील व्यंकटेश अॅग्रोचा दुकानमालक केदार जाजू हा एक हजार रुपयांना हे बोगस कपाशी बियाणे विकत होता. तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी हे बियाणे खरेदी केले होते. यातीलच एका शेतकऱ्याला सोमवारी या दुकानावर डमी ग्राहक म्हणून पाठविले.

हे ही वाचा : औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित कैदी पळाले, कोविड सेंटरमधून केला पोबारा   

त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. दरम्यान, या डमी ग्राहकाने पैसे दिल्यानंतरही बियाणे देण्यास त्याने काही वेळ लावला. त्यानंतर अधिकारी गेल्यानंतरही त्याने ना-नू केली; मात्र दुकानाची व गोदामाची झडती घेतल्यानंतर एका मूग बियाणाच्या पोत्यात ही पाकिटे आढळून आली. याप्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी पेठ बीड पोलिसांत फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे

हे ही वाचा :  रिकामे हात अन् हवालदिल मन...मजुरांची अशीही व्यथा   

  • कृषी अधिकाऱ्यांची केदार जाजूच्या व्यंकटेश अॅग्रोमध्ये कारवाई
  • मुगाच्या बियाणांच्या पोत्यात बोगस कपाशी बियाणे
  • डमी ग्राहक पाठविला; एक हजार रुपयांना पाकीट

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed: Bogus cotton seeds racket exposed by agriculture department