बीड बायपासवर बळी सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार झाली, तर त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली. ही घटना बीड बायपास रस्त्यावरील संग्रामनगर चौकात गुरुवारी (ता. २३) सकाळी घडली.

औरंगाबाद - ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार झाली, तर त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली. ही घटना बीड बायपास रस्त्यावरील संग्रामनगर चौकात गुरुवारी (ता. २३) सकाळी घडली.

लता श्रीरंग लोलवार (वय ४८, प्लॉट क्रमांक ७४, नारायणनगर सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात त्यांची मुलगी अंजली किरकोळ जखमी झाली. बीड बायपास रस्त्यावरून लता लोलवार व अंजली एकाच दुचाकीने उस्मानपुरा येथे जात होत्या. संग्रामनगर चौकात वळण घेताना महानुभाव चौकाकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. यात दोघी खाली कोसळल्या. लोलवार यांचा उजवा पाय व हातावरून ट्रक गेला. त्यांच्या डोक्‍याला इजा झाल्याने रक्तस्त्राव झाला. पडल्यामुळे त्यांच्या डोक्‍याला मार लागला असावा; परंतु वरून जखम नाही, अशी माहिती सातारा पोलिसांनी दिली. अपघातानंतर लगेचच अंजली व लता लोलवार यांना याच भागातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती एका कंपनीत कामगार असून, त्यांना छोटा मुलगा आहे. घटनेची नोंद सातारा पोलिसात झाली.

वाहनचालकांचा आततायीपणा
 बीड बायपासवर जड वाहने त्यांच्या गतीने जातात 
 जड वाहनांना ओव्हरटेक करण्याचे वाढते प्रकार
  सिग्नल सुटल्यानंतर लागलीच सुसाट घेतात वळणे
 सिग्नलला पाच सेकंद बाकी असतानाच करतात घाई
 ग्रीन सिग्नलकडे धावणाऱ्या वाहनांसोबत बसतात धडका
 बेफाम वेगातील ट्रककडूनही मोठ्या अपघाताच्या घटना.

धोकादायक चौक
बीड बायपासवर देवळाई, संग्रामनगर, एमआयटी महाविद्यालय, महानुभाव आदी चौक आहेत. या चौकांत लागलेल्या लाल दिव्यांमुळे वाहनांची गर्दी वाढते. सर्वांना एकाचवेळी सुसाट सुटायचे असल्याने अपघात होतात.

Web Title: Beed Bypass Highway Accident Death