बीड बायपासवरील 21 अतिक्रमणे भुईसपाट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शनिवारी (ता. 19) बीड बायपास मार्गावर विशेष मोहीम हाती घेऊन जेसीबीने दिवसभरात 21 अतिक्रमणे भुईसपाट करुन बीड बायपास मोकळा केला. रस्त्याच्या कडेलाच विविध प्रकारचे छोटे शेड उभारून त्यात अतिक्रमणधारकांनी व्यवसाय सुरू केला होता. कारवाईदरम्यान सर्वाधिक पत्र्याचे शेड पाडण्यात आल्याचे या विभागाचे प्रमुख उपायुक्‍त रवींद्र निकम यांनी सांगितले.

बीड बायपास रोडवरील सर्व्हे नंबर 20 व 21 मध्ये सुमारे 21 व्यावसायिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणे करून दुकाने थाटली होती, काहींनी दुकानांचे ओटे पुढे सरकावले होते; तर काहींनी पत्र्यांचे शेड ठोकले होते. जवळपास 9.60 हेक्‍टर परिसरात ही अतिक्रमणे करण्यात आली होती. या अतिक्रमणांमुळे बीड बायपास रोडवर राहणाऱ्या तीन सोसायट्यांमधील सुमारे दहा हजार नागरिकांना या अतिक्रमणांमुळे त्रास होत होता. त्यामुळे येथील नागरिकांनी या अतिक्रमणांबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करून अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली होती. त्यावरून महापालिका पथकाने ही अतिक्रमणे भुईसपाट केली. यात मोठ्या दुकानांपैकी रॉयल मार्बल, सिटी मार्बल ग्रेनाईट, पारस मार्बल ग्रेनाईट, श्री मार्बल, क्वालिटी मार्बल, आदिनाथ मार्बल, बॉम्बे चायनीस ऍण्ड टूर स्पॉट, जे. के. स्ट्रीट, बालाजी टाईल्स, जैन मार्बल अँड टाईल्स, जैन मार्बल, सुपर ग्रॅनाईट, राजधानी मार्बल, शिवकृपा ग्रेनाईट, राईट सन मार्बल, निवास मार्बल, एस. ए. मार्बल ऍण्ड ग्रेनाईट, लोकसेवा टी हाऊस यांसह सहारा बकटा मटण शॉप व जनता बकरा मटण पाडण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून या अतिक्रमणांचा मुद्दा महापालिकेत गाजत होता. दोन बकरा मटण शॉपची पाडापाडी करण्यात आली. महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या आदेशानुसार उपायुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे प्रमुख सी. एम. अभंग, एम. एम. खान, इमारत निरीक्षक एस. एस. विधाते, आर. एच. राचतवार, सय्यद जमशीद यांनी ही कारवाई केली. सकाळी साडेदहा वाजेपासून मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरवात करण्यात आली होती. या कारवाईमुळे बीड बायपासवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळित झाली होती.

Web Title: Beed bypass road encroachment